26 October 2020

News Flash

वर्धा जिल्ह्यातही आता प्लाझ्मा संकलन सुरू; दोन ठिकाणी सुविधा

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत प्लाझ्मा दान करण्यास सुरुवात

प्लाझ्मा दात्याचे अभिनंदन करतांना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार.

सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेने आजपासून(२० जुलै) कोविड प्लाझ्मा संकलन सुरू केले आहे. कोविड -19 संसर्गातून मुक्त झालेल्या व्यक्तींच्या रक्तात अँटीबॉडी तयार होत असतात, ज्या करोना विषाणू विरूद्ध लढायला मदत करतात. करोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मामुळे करोनाबाधित रूग्णांची रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते आणि रुग्ण करोनातून लवकर बरा होतो. या सुविधेमुळे करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढणार असून, अशी सुविधा उपलब्ध असलेला वर्धा हा नागपूर विभागातील दुसरा जिल्हा आहे.

करोनातून बरे झालेले उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे प्रथम प्लाझ्मा दाता होते. तसेच, कोविड संसर्गापासून बरे झालेले सुधांशु डूकरे यांनीही प्लाझ्मा दान केले.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत प्लाझ्मा दान करण्यास सुरुवात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले उपस्थितीत होते. कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे विश्वस्त पी.एल. तापडिया, कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेग्रामचे सचिव डॉ. बी.एस. गर्ग, एम.जी.आय.एम.एस सेवाग्रामचे डीन डॉ. नितीन गंगणे, पॅथॉलॉजी विभागातील प्राध्यापक व प्रमुख डॉ. अनुपमा गुप्ता, ब्लड बॅंकेचे प्राध्यापक व प्रभारी व्ही.बी. शिवकुमार उपस्थित होते.

रुग्णालयातून सुटी झाल्यावर २८ दिवसांच्या कालावधीनंतर करोनावर मात केलेली व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यास पात्र आहेत. प्लाझ्मा दान करण्यासाठी सुमारे ४५ ते ६० मिनिटे लागतात. करोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. एमजीआयएमएस सेवाग्राम व कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये कोविड संसर्गाचे निदान व उपचारासाठी सर्व आवश्यक सुविधे सोबतच आता प्लाझ्मा उपचारही उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 4:48 pm

Web Title: plasma collection facility now in wardha district also msr 87
Next Stories
1 वर्धा : वृक्षतोड रोखण्यासाठी महिलांकडून ‘रक्षा सूत्र’ अभियान
2 राज्यात २४ तासांत आणखी ११७ पोलीस करोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
3 काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात
Just Now!
X