News Flash

सांगलीत डाळिंबाच्या बागेवर प्लास्टिकचे आच्छादन

पाऊस, धुके, उन्हापासून बचावासाठी शेतक ऱ्यांकडून उपाय

प्लास्टिकने आच्छादन केलेली आटपाडीतील एक डाळिंब बाग.

दिगंबर शिंदे

कधी पाऊस, कधी धुके, तर कधी उन्हाची तीव्रता यामुळे निर्यातक्षम डाळिंबाचे संरक्षण करण्यासाठी आटपाडीच्या शेतकऱ्यांनी संपूर्ण बागेवर प्लास्टिकचे आच्छादन केले आहे. बदलत्या हवामानामुळे डािळबाला तडे जातात. प्रत खालावल्यामुळे निर्यातीसाठी ती नाकारली जाण्याचा धोका टाळण्यासाठी हे उपाय करण्यात येत आहेत.

आटपाडी तालुक्यात डाळिंबाचे उत्पादन निर्यातीसाठी  घेतले जाते. मात्र यावर्षी अवकाळी पावसाने बरेच दिवस ठाण मांडले होते. मृगबहारात आलेले फळ अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झाले आहे. यातच अजूनही ढगाळ हवामानामुळे प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब पिकाचे जतन करणे जिकिरीचे झाले आहे. धुके, ढगाळ हवामान आणि दुपारी उन्हाचा कडाका यामुळे डाळिंबाला तडे जात आहेत. या विचित्र हवामानापासून डाळिंबाचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण बागेलाच प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात येत आहे.

खास करून युरोपला निर्यात होणाऱ्या डाळिंब बागेवर हा आच्छादनाचा प्रयोग मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे.  आधीच  पावसाने या भागातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाल्याने डाळिंबाला फळधारणा  देखील कमी झाली आहे. मात्र जी फळे आहेत ती फळे तरी हाती लागावीत या हेतूने शेतकऱ्याची धडपड दिसून येत आहे. उन्हामुळे डाळिंबाला तडे जाऊन डाळिंब खराब होत असतात. तसेच धुक्यामुळे मोठय़ा प्रमाणावर बुरशीजन्य रोग येतात.

या साऱ्या संकटापासून डाळिंब पीक वाचवण्यासाठी शेतकरी ही धडपड करताना दिसतो आहे. या डाळिंबाला टाकल्या जाणाऱ्या कागदाला अनुदान मिळावे ही मागणीही डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:23 am

Web Title: plastic cover over sangli pomegranate garden abn 97
Next Stories
1 भाजपचे वाढत्या नाराजीवर चिंतन
2 कत्तल खान्यापर्यंत गाय पोहोचवणारे हिंदूच ठेकेदार : मोहन भागवत
3 महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती – उद्धव ठाकरे
Just Now!
X