महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. यावरच्या उपाय योजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. या चर्चेत गुरुवारी सकाळी ११ वाजता होणाऱ्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगबाबतही चर्चा झाली. सध्या महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची काय स्थिती आहे? काय उपाय योजता येऊ शकतात या संदर्भात या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ३३५ झाली आहे. महाराष्ट्रासाठी हा नक्कीच चिंतेचा विषय ठरला आहे. अशात आता महाराष्ट्रातल्या उपाययोजना या अधिक कठोर केल्या जातील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्त वाढू नयेत म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच दररोज खबरदारी बाळगण्याच्या सूचनाही केल्या जात आहेत. अशात महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे आणि आणखी काय काय करता येईल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते आहे.