News Flash

गाथा महाराष्ट्राची! मराठी काव्य परंपरेवर ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांचे व्याख्यान!

‘गाथा महाराष्ट्राची’ उपक्रमाचा समारोप आज अरुणा ढेरे यांच्या व्याख्यानाने

शाळेत जायला लागल्यापासून प्रत्येकाच्या आयुष्यात कवितेचाही प्रवेश होतो. अनेक जण काव्याच्या या तरल प्रदेशात हरखून जातात, काही जण कवीही होतात. कवितेच्या प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला मराठी कवितेच्या समृद्ध परंपरेचा धांडोळा घ्यावा, असे वाटतेच. त्यासाठी आज, दि. १४ मे रोजी ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन केले असून त्याचा समारोप डॉ. ढेरे यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘मराठी कवितेची परंपरा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

हा कार्यक्रम LoksattaLive युट्यूब चॅनेलवर तुम्ही पाहू शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 2:19 pm

Web Title: poet dr aruna dhere in loksatta gatha maharashtra sgy 87
Next Stories
1 “केंद्रानं पुरवलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा, तंत्रज्ञांनाही दुरुस्त करता येईनात!”, सचिन सावंत यांचा आरोप!
2 जयंत पाटील नाराज आहेत?; अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले…
3 राऊत साहेब, डोळे उघडा… किती यादी सांगू?; भाजपाचा पलटवार
Just Now!
X