16 October 2019

News Flash

श्रीकांत देशमुख यांच्या काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार

१२ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार पुरस्कार वितरण

यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेली मराठी साहित्य विभागातील पुस्तके.

प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही…’ या काव्य संग्रहाला २०१७चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्लीतील रवींद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांची घोषणा यावेळी करण्यात आली. १२ फेब्रुवारी २०१८ रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मराठी कवी श्रीकांत देशमुख लिखित ‘बोलावे ते आम्ही…’ या काव्यसंग्रहाची मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली. १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

त्याचबरोबर सुजाता देशमुख यांना अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुजाता देशमुख अनुवादित ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकास उत्कृष्ट अनुवादाच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘माय नेम इज गौहर जान’ या विक्रम संपथ लिखित इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला आहे. ५० हजार रुपये रोख, ताम्रपट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य अकादमीच्या मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक संजय पवार, पुष्पा भावे आणि सदानंद मोरे यांचा समावेश होता.

एकूण २४ भाषांमध्ये ७ कादंबऱ्या, ५ काव्यसंग्रह, ५ लघू कथा, ५ समिक्षात्मक पुस्तके तर १ नाटक आणि १ निबंध या पुस्तकांची यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांमध्ये वर्णी लागली आहे.

First Published on December 21, 2017 5:32 pm

Web Title: poet shrikant deshmukh has been awarded the sahitya akademi award this year