27 February 2021

News Flash

आंबेनळी घाटातून बाहेर काढण्यात आली 33 जणांचे बळी घेणारी बस

दोन महिन्यांपूर्वी अपघात होऊन ही बस सुमारे 800 फूट खोल दरीत कोसळली होती

पोलादपूर बस अपघातातील बस अखेर बाहेर काढण्यात आली आहे. 28 जुलैला दापोली कृषी विद्यापीठाची बस 800 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला. तर या भीषण अपघातातून प्रकाश सावंत हे आश्चर्यकारकरित्या बचावले. कुलगुरू भवनातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काढलेली ही सहल होती. यामध्ये इतर विभागातील कर्मचारी, त्यात प्रामुख्याने कारकून आणि वरिष्ठ पदावर काम करणारे कर्मचारी सहभागी झाले होते.

साधारणपणे दरवर्षी हे कर्मचारी जुलै ते ऑगस्टदरम्यान वर्षा सहल काढत असत.आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. ही बस काढण्याचे काम सुरु असल्याने सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असेही आवाहन रायगड प्रशासनाने केले होते. आता अखेर ही बस बाहेर काढण्यात आली आहे.

दरम्यान, घटनास्थळी मृत व्यक्तीच्या नातेवाईक उपस्थित होते. या घटनेच्या ३ महिन्यानंतर ही नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. यावेळी नातेवाईकांनी संबंधित घटना उघडकीस आणण्यासाठी सीबीआय चौकशी आणि नार्को टेस्टची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 6:28 pm

Web Title: poladpur accident the bus outside of the valley
Next Stories
1 घरात पंखा, टीव्ही आणि फ्रिज, वीज बिल दीड लाख रुपये!
2 संधी मिळाली तर गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवू : आशिष देशमुख
3 Nalasopara Explosive Case : अमोल काळे, अमित बद्दी, गणेश मिस्त्रे यांना एटीएसची कोठडी
Just Now!
X