डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत डीजे व डॉल्बीचा प्रचंड वापर करून मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण केल्याबद्दल अखेर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत २२ सार्वजनिक मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मिरवणुकीत ध्वनिमर्यादा तब्बल ११० ते १४५ डेसिबलपर्यंत वाढल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही कारवाई करताना डीजे व डॉल्बीची महागडी यंत्रसामग्री जप्त केली नाही.
काल रविवारी रात्री बारापर्यंत डॉ. आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणूक चालली होती. दिवसभर या मिरवणुकीत डीजे तथा डॉल्बीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावर ध्वनिप्रदूषण झाले होते. त्यास पोलिसांनी वेळेतच अटकाव करण्याचे टाळले. परंतु मिरवणूक संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कारवाई केली गेली. ध्वनिमर्यादा दिवसा ४० ते ७० तथापि या मिरवणुकीत ध्वनिमर्यादा तब्बल ११० ते १४५ डेसिबलपर्यंत वाढल्याचे पोलिसांनी केलेल्या यांत्रिक तपासणीत आढळून आले. त्यामुळे संबंधित २२ सार्वजनिक मंडळांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दिवसा ५० ते ७५ डेसिबल तर रात्री ही मर्यादा ४० ते ७० डेसिबलपर्यंत राखली जाणे कायद्याने बंधनकारक होते. पोलीस ठाणेनिहाय गुन्हे दाखल झालेल्या मंडळांची नावे अशी-सदर बझार पोलीस ठाणे-न्यू संघ रक्षित क्रीडा समाज मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, सिध्दार्थ तरुण मंडळ, मातोश्री रमाबाई तरुण मंडळ, संघमित्र तरुण मंडळ, तक्षशीला मंडळ व कपिल तरुण मंडळ. जोडभावी पेठ पोलीस ठाणे-भीमसृष्टी प्रतिष्ठान, सुभेदार रामजी तरुण मंडळ, रमापती तरुण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय मंडळ, बबन भंडारे कला सांस्कृतिक मंडळ, बुध्दराष्ट्र प्रतिष्ठान, रमांजली तरुण मंडळ. एमआयडीसी पोलीस ठाणे- भीमशक्ती समाज मंडळ, भीमक्रांती तरुण मंडळ. फौजदार चावडी पोलीस ठाणे- छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान, पंचशील तरुण मंडळ, रॉकी प्रतिष्ठान, जीएम ग्रुप, पीबी ग्रुप, बुध्ददर्शन तरुण मंडळ.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
Dr. Babasaheb Ambedkar and Kalaram Mandir Satyagraha
काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर झालेली दगडफेक, १९३० मध्ये ‘त्या’ दिवशी नेमके काय घडले होते?
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”