20 February 2019

News Flash

मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणात एसआरपीएफच्या जवानाला अटक

एसआरपीएफच्या जवानाने विवाहित महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

एसआरपीएफच्या जवानाने विवाहित महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. योगेश सुरेश शिनगारे आरोपी पोलिसाचे नाव असून सातारा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

२४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातारा परिसरात राहणाऱ्या सुरेखा राजेंद्र ठाले या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोराने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी त्याच दिवशी त्यांनी सातारा परिसरात गुन्हा दाखल झाला होता.

वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे आणि पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. चव्हाण यांनी या प्रकरणी गांभीर्याने तपास सुरु केला. दरम्यान, आज पहाटे काही धागेदोरे हाती लागले त्याआधारावर पोलिसांनी योगेश सुरेश शिनगारे याला ताब्यात घेतले. शिनगारे याची अधिक चौकशी केली असता त्याने ठाले यांचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.

योगेश शिनगारे हा राज्य राखीव दलातील कॉन्स्टेबल आहे. शिनगारे हा कर्जबाजारी असून त्याला दारूचे व्यसन आहे. सातारा परिसरात जानेवारी पासून झालेल्या १० ते १२ मंगळसूत्र चोरीच्या घटनांचा पोलीस तपास करत आहेत.

First Published on October 12, 2018 6:23 pm

Web Title: police arrest crpf constable in theft case