News Flash

१५ वर्षांपासून फरार असलेला एका आरोपीसह इतर आरोपींना पोलिसांकडून अटक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर जिल्ह्यातील वडगाव बक्षी येथील अनिल अजाबराव बावणे याच्यावर वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र २००३ पासून तो फरार होता. मात्र आज राहत्या घरातून या आरोपीला अटक करण्यात आली आहे. २००८ पासून फरार असलेल्या प्रशांत खातखेडे या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात न्यायालयाने २०१६ अटक वॉरंट जारी केले होते. अखेर आर्वीच्या सिंधी कॅम्प या ठिकाणी तो असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

विविध गुन्हे दाखल असलेला अजय काळसकर हा देखील २००७ पासून न्यायालयीन तारखेवर गैरहजर होता. त्याच्याही मागावर पोलीस होते. आज या आरोपीलाही त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. प्राणघातक हल्ला आणि अन्य गुन्हे दाखल असलेला वर्धा येथील दिनेश यादव हा देखील पाच महिन्यांपासून फरार होता. त्याला नागपूरच्या संत्रा मार्केटमधून उचलण्यात आले.

वर्धा येथील नरेश जेठे यालाही पोलिसांनी अटक केली आहे. नरेशही अनेक वर्षांपासून फरार होता. आर्वी येथील दिलीप नथ्थूजी राऊत हा देखील २००६ पासून न्यायालयात हजेरी लावत नव्हता. त्याचेही अटक वॉरंट काढण्यात आले. तो नागपूर जिल्ह्यातील बाबुरवाडा येथून त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस निरीक्षक, निलेश ब्राह्मणे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी या सगळ्या आरोपींना अटक केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 8:17 pm

Web Title: police arrested absconding absconding accused from nagpur and wardha scj 81
Next Stories
1 बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेना शिवसेना होती : नारायण राणे
2 नवे रस्ते घडवलेत तरी घडेल नवा महाराष्ट्र! आदित्य ठाकरेंच्या ट्विटला सुमीत राघवन यांचे उत्तर
3 २४ ऑक्टोबरला राज्यात परिवर्तन दिसेल – नवाब मलिक
Just Now!
X