राहाता : शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील  विभागामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईकास वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादी याचे कडून उपस्थित पंचासमक्ष २०  हजारांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई रविवारी रात्री ८  वाजता करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे

भाऊसाहेब संपत सानप (वय—४४, राहणार संगमनेर, नेमणूक लोणी पोलीस ठाणे) हा पोलीस नाईक संलग्नीत शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या अधिपत्याखाली असलेल्या स्ट्रायकींग फोर्स या पथकात नेमणुकीस होता. आरोपी पोलीस नाईक सानप याने कोळपेवाडी येथील वाळूचा व्यवसाय असलेल्या तक्रारदार याच्या  वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादी याचेकडून पोलीस नाईक भाऊसाहेब सानप याने फिर्यादीकडे दि.२७ मे रोजी ८ वाजेच्या सुमारास तीस हजारांची रक्कम मागितली होती व तडजोडी पोटी वीस हजार रुपये घेण्यासाठी फिर्यादीने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष व पंचासमक्ष वीस हजार रुपये मागताना त्याचा पुरावा तयार केला आहे. त्या प्रकरणी त्याच्या विरोधात आज सकाळी ६.१२ वाजता लाचलुचपत विभागाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साळुंखे, पालकर आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.