News Flash

बेडीसह पळून गेलेला अत्याचार प्रकरणातील आरोपी पकडला

आठ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी शिरसगाव हद्दीत त्याचा कसून शोध घेतला.

श्रीरामपूर  : मुलीवर अत्याचार करणारा आरोपी वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात आणला असता तो   पोलिसांना गुंगारा देऊ न बेडीसह पळून गेला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी मोहीम उघडली आहे. मात्र रात्री उशिरा त्याला गोंधवणी येथे पकडण्यात आले.

मुलीवर अत्याचार करणारा आरोपी  राहुल गणेश शिंदे (वय २०, रा. लाडगाव, ता. वैजापूर ) याला आज  दुपारी एक वाजेच्या दरम्यान  पोलिस शिपाई प्रवीण क्षिरसागर, पोलिस शिपाई मनोज हिवाळे यांनी  ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आणले होते. त्याचे रक्ताचे नमुने घेतल्यानंतर त्यास लघवीचा नमुना देण्यासाठी त्याला शौचालयात पाठविले होते. शौचालयातून तो बाहेर पोलिसांसमोर जोरात पळत सुटला व भिंतीवरून उडी मारून पळाला.   तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला. यावेळी पोलिसांसमवेत रुग्णालय कर्मचारीही त्याच्या मागे पळाले. शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके परिसरात पाठविली  होती.

त्याने येथील खिलारी वस्ती येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्या गुन्ह्यतील राहुल  हा आरोपी आहे. त्याने मुलीला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला असा गुन्हा शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे. शिंदे हा पोलिस कोठडीत होता. त्याची मुदत आज संपणार होती.

वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयासमोर हजर करणार त्यापूर्वी तो रुग्णालयात पळाला, असे तपास अधिकारी संभाजी पाटील यांनी सांगितले.

दरम्यान बलात्काराच्या गुन्ह्यतील राहुल शिंदे हा आरोपी आहे. त्यांला तपासणीसाठी रुग्णालयात नेले होते. तेथून तो पळाला. पोलिसांनी त्याला गोंधवणी येथे पकडले असे  पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सांगितले.

दरम्यान, आठ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांनी शिरसगाव हद्दीत त्याचा कसून शोध घेतला. परिसरातील ऊ स पिकातही शोधले. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोंधवणी रस्त्याजवळ त्याला पकडण्यात यश आले.

तिघा पोलिसांवर कारवाई

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलेला आरोपी पळून गेला. यावेळी त्याच्यासोबत तीन कर्मचारी होते. मात्र, तो सापडल्याने कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र  कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 1:17 am

Web Title: police arrested accused in girl molestation case after abscond zws 70
Next Stories
1 अवैध वाळू व्यवसाय; दोनशेंवर व्यक्तींविरुद्ध गुन्हे
2 महाविद्यालयाच्या फलकावर प्राध्यापकांच्या वेतनाचे आकडे
3 नांदेडमध्ये फोन न उचलण्यावरून गोळीबार
Just Now!
X