दलित पँथरच्या कार्यकर्त्याचा मृतदेह कारमध्ये मिळाला होता. त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून आता प्रकाश कासारे यांच्या खुन्यालाही अटक करण्यात आली आहे. फोन उचलल्याच्या क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. अंकुश तुपे असे खुन्याचे नाव आहे त्याने कासारेंची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अंकुश तुपे हा कामगार आहे अशीही माहिती समोर आहे.

प्रकाश कासारे आणि अंकुश तुपे या दोघांचीही ओळख होती. दोघेही रविवारी रात्री शेंद्र परिसरात मद्यपान करत बसले होते. कासारे लघुशंकेसाठी गेले होते त्याचवेळी त्यांचा फोन वाजला जो तुपेने उचलला. याच रागातून कासारे यांनी तुपेला शिवीगाळ केली. दोघांचा वाद वाढल्याने बार चालकाने या दोघांना हाकलून दिले. कासारे तिथून थेट त्यांच्या गोदामाजवळ येऊन थांबले होते त्याचवेळी अंकुश तुपेने पाठीमागून येत कासारेंचा गळा आवळला आणि त्यांची हत्या केली. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी ही माहिती दिली.

शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत प्रकाश कासारे यांचा मृतदेह आढळला होता. प्रकाश कासारे यांना गळा आवळून ठार केल्याची माहिती सोमवारीच समोर आली होती. त्यांची हत्या झाली की नाही याचा तपास पोलीस घेत होते कारण मृतदेहावर गळ्याने आवळल्याच्या खुणा होत्या. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. हा खून फोन उचलल्याच्या क्षुल्लक वादातून झाल्याची माहिती समोर आली आहे.