३ तारखेला औरंगाबाद परिसरातील कुंभेफळ यैथील एसबीआय बॅंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केलं आहे.
अमरिकसिंग हजारीसिंग, जसविंदरसिंग दलविरसिंग, हरपालसिंग अमरजितसिंग ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहे. पहिल्यांदाच आम्ही प्रयत्न केला असे हे चोरटे सांगत आहेत. तिघेही छत्तीसगढमधील रायपूरमध्ये काम करत आहेत.

पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय भगतसिंग दुलत यांनी टोलनाक्यावरुन शहराबाहेर जाणार्‍या गाड्यांची माहिती घेतल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमधे हे तिघे आढळले. छत्तीसगडमधून ट्रकच्या मालकाची माहिती घेत ट्रकचे सध्याचे लोकेशन पीएसआय दुलंत यांनी घेतले. पथकासह वर्ध्याला जात शुक्रवारी पहाटे अटक करुन शहरात आणले. चोरट्यांनी जबाब नोंदवताना सांगितले की, कोणतेही एटीएम फोडण्यासाठी एक महिना आधी त्या ठिकाणाची रेकी केली जात होती. त्यानंतर एटीएम समोर ट्रक आडवा लावून वरील तिन्ही आरोपी पैकी एकाच्या एटीएम मधे पैसे असल्याची खात्री केली. चोरट्यांनी रायपूरहून एटीएम फोडण्यासाठी लागणारे गॅस सिलेंडर घेतले होते. नांदेडहून कटर घेतले होते. आता या तिघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे.