News Flash

पंखा चोरीच्या संशयातून हत्या, राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगपटू आरोपी

मनोज बद्रीनाथ डव्हारेला अटक करण्यात आली आहे, इतर तीन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

औरंगाबादमध्ये कचरा ट्रकवरील चालकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली होती. चोरट्यांच्या मारहाणीत हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली होती. मात्र ट्रक मालक आणि त्याच्या साथीदाराने पंखा चोरून नेल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत नितीन उर्फ बाळू भीमराव घुगे याचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. याप्रकरणी मनोज बद्रीनाथ डव्हारे (वय-२४) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार नील काकासाहेब काकडे पाटील, दत्ता भांगे आणि शुभम पाटील हे तिघे फरार आहेत.

नील पाटील आणि मनोज डव्हारे हे दोघेही भागीदारीत व्यवसाय करतात. दोघेही नात्याने मावस भाऊ आहेत. दोघांमकडे मिळून सहा ट्रक आहेत. अशी माहिती सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. मनाेजची चाैकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या उत्तरांवर पोलिसांना संशय आला. आराेपींनी नितीन घुगेला काल्डा काॅर्नर भागात मारहाण केली. तेथून त्या परिसरात असलेल्या त्यांच्या फ्लॅटवर नेले. तेथे काही रक्ताचे डाग आढळले. प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून चाेरट्यांनी मारहाण केल्याचा बनाव रचला.

त्यानंतर आराेपींनी घटना टीव्ही सेंटर भागात घडल्याची एक तक्रार टीव्ही सेंटर पाेलीस ठाण्यात नाेंदवली. नंतर जखमी अवस्थेतच नितीनला घाटी रूग्णालयात दाखल केले. तिथे गुरुवारी मध्यरात्र उलटून गेल्यावर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिन्ही आराेपी फरार झाले. मनाेजने स्वतः नितीनला दाखल केले पण नाव सांगितले दत्ता भांगेचे. त्यावरूनच पोलिसांना संशय आला हाेता. पोलिसांतनी काल्डा कॉर्नर येथील एका अपार्टमेंटची झाडाझडती देखील घेतली आहे. ज्या कारमधून नितीनला रुग्णालयात दाखल केले ती कारही पोलिसांनी जप्त केली, अशी  माहिती सहायक पाेलीस निरीक्षक व्ही. के. झुंजारे यांनी दिली.

नितीन दीड महिन्यांपूर्वी मनाेज डव्हारे याच्याकडे चालक म्हणून लागला हाेता. आराेपींमधील नील पाटील  बाॅक्सिंगचा राष्ट्रीय खेळाडू राहिलेला असून त्याच्याविरुद्ध क्रांती चाैक पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळते. याप्रकरणी मृत नितीनचा भाऊ सचिन घुगे याच्या तक्रारीवरून सिडकाे पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2018 4:54 pm

Web Title: police arrested one person in the aurangabad truck driver murder case
Next Stories
1 राफेल प्रकरणावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच उत्तर द्यावं : संजय राऊत
2 शरद पवारांना सांगितलं, फसवाफसवी करू नका-उदयनराजे
3 पुण्याहून मुंबईला जाणारा मालवाहू ट्रक पुलावरून कोसळला
Just Now!
X