19 November 2019

News Flash

कुंटणखान्यावर छापा टाकणाऱ्या पोलिसांवर हल्ला, दोन जखमी

छापा टाकण्यास गेलेल्या पोलीस पथकावरच कुंटणखाना चालकांनी हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

संग्रहित छायाचित्र

नगर : छापा टाकण्यास गेलेल्या पोलीस पथकावरच कुंटणखाना चालकांनी हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपुलजवळ (ता. नगर) ही घटना आज, शुक्रवारी मध्यरात्री घडली. दगडाने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस किरकोळ जखमी झाले.

शहर पोलिसांनी काल, गुरुवारी सायंकाळी तपोवन रस्त्यावरील श्रावणी वसाहतीत चालणाऱ्या कुंटणखान्यावर कारवाई केली. त्यानंतर नगर ग्रामीणचे उपअधीक्षक मनीष कलवानिया यांना मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक पांढरीपुल भागात जय मल्हार या हॉटेलमध्ये चालवल्या जात असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकण्यास गेले. छापा टाकल्यानंतर तेथे पाच महिला व सहा पुरुष आढळले. पोलीस महिलांची माहिती घेत असतानाच गंगाराम जानकु काळे व रशिद सरदार शेख हे दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पकडले. मात्र काळे याने दगड फेकून मारल्याने पोलीस कर्मचारी सिद्धार्थ घुसळे जखमी झाले तर रशिद शेख याने मारहाण केल्याने अक्षय वडते जखमी झाले.

First Published on July 13, 2019 2:46 am

Web Title: police attack after raid on brothel operating at nagar aurangabad road zws 70
Just Now!
X