पोलिसांच्या निलंबनाची यंग चांदा ब्रिगेडकडून मागणी

चंद्रपूर : घरातील सोने चोरी केल्याच्या संशयावरून घरकाम करणाऱ्या एका महिलेला राजुरा पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून छळ केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोषी पोलिसांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना   निवेदनातून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा महिलांनी पत्रपरिषदेत दिला.

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव

पीडित महिला ही राजुरा येथे घरकाम करीत होती. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता राजुरा   ठाण्यातील पोलिसांनी या महिलेच्या हडस्ती येथील घरी येऊन तिला व तिच्या पतीला पोलिसांच्या वाहनातून पोलीस ठाण्यात आणले. ज्यांच्याकडे घरकाम करते त्यांनी पोलिसांमध्ये घरी चोरी केल्याची तक्रार आली असे सांगत तिला व तिच्या पतीला पोलिसांनी मारहाण केली.

एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने पकडून ठेवले व तीन ते चार पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी रबरी पट्टय़ाने मारहाण केली तसेच तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर रात्री १० वाजता पीडितेला व पतीला पोलिसांनी पोलिसांच्या वाहनाने घरी सोडून दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी १० वाजता त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले.

यावेळी पीडितेच्या पतीला पोलिसांनी बाहेर थांबण्यास सांगितले. तिला आतील खोलीत नेले. तेव्हा एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर दोन महिला पोलीस, तीन पुरुष पोलीस खोलीत होते. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी चोरलेले सोने परत कर असे म्हणत पीडितेला मारहाण सुरू केली. पीडिता मी चोरी केलेली नाही असे वारंवार सांगत होती. तरीही पोलिसांनी मारहाण सुरूच ठेवली. पीडितेची साडी काढून तिला पुरुष पोलिसांसमोर नग्न करण्यात आले. नंतर तिला पोलिसांनी पट्टय़ाने मारहाण केली.

तिच्या दोन्ही मांडीवर उभे होऊन महिला पोलिसाने तिच्या गुप्तांगात मिरची पावडर टाकून मारहाण केली. यामुळे वेदनेने पीडिता अर्धबेशुद्ध झाली. त्यानंतर तिला रात्री १० वाजता घरी सोडले. पीडितेला असहय़ वेदना होत असल्याने दुसऱ्या दिवशी बुधवारी तिच्या घरच्यांनी राजुराच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तीन दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले.

मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी पिडीत महिलेच्यावतीने यंग चांदा ब्रिगेडने केली आहे. तसेच पुरुष कर्मचाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात यंग चांदा ब्रिगेडची तक्रार प्राप्त झालेली आहे. या प्रकरणाची चौकशी अति.पोलीस अधीक्षक यांना करण्याचे निर्देश दिले आहेत. या चौकशीत कुणी दोषी आढळल्यास योग्य कारवाई करण्यात येईल.

– डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर</strong>