News Flash

बीडमधील हलगर्जीपणा; करोनाबाधित पोलिसाची लावली ड्यूटी, त्यानंतर …

धक्कादायक! करोना योद्ध्यालाच रुग्णवाहिका नाही

प्रतिकात्मक छायाचित्र

करोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणार्‍या पोलिसांचे कौतुक होत असले तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या नशिबी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे हाल सोसण्याची वेळ येते आहे. रात्री कोरोना बाधित येऊनही एका पोलिसाला सकाळपर्यंत नाकाबंदीच्या ठिकाणी कर्तव्य पार पाडावे लागले. रात्रभर रुग्णवाहिका आली नसल्याने कर्तव्य पूर्ण करुन सकाळी कर्मचार्‍याला दुचाकीवर रुग्णालय गाठावे लागले.

बीड जिल्ह्यातील परळी शहर ठाण्यातील 42 वर्षीय पोलिस कर्मचार्‍याला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हा कर्मचारी बीड-लातूर सीमेवरील जोडवाडी येथे नाकाबंदीसाठी कर्तव्यास होता. शुक्रवारी त थुंकीचे नमुने घेण्यात आल्यानंतरही शनिवारी नाकाबंदीच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली. शनिवारी दिवसभर या कर्मचार्‍याने दोन सहकार्‍यासह एका पोलीस अधिकार्‍यासोबत कर्तव्य बजावले. रात्री उशिरा कर्मचार्‍याचा अहवाल करोना सकारात्मक आल्याचे सांगण्यात आले. त्यांना तातडीने करोना कक्षात दाखल करणे गरजेचे होते. मात्र रुग्णवाहिका पाठवण्यात आली नाही.

करोना बाधा झालेली असतानाही रात्रभर पोलीस कर्मचार्‍याने इतरांना लागण होणार नाही याची काळजी घेत कर्तव्य बजावले. रविवारी सकाळी आठ वाजता सुटी झाल्यानंतर कर्मचारी दुचाकीवर जावून परळी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. वाटेत त्याला काही त्रास होऊ नये म्हणून अन्य तीन सहकारी त्यांच्या दुचाकीच्या मागे वाहन घेऊन गेले होते. दरम्यान या प्रकारामुळे खळबळ उडाली असून एका पोलीस कर्मचार्‍याला आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणाचा त्रास सहन करावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 9:31 am

Web Title: police corona positive virus ambulance duty checkpost beed nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष पाऊणकर व सीईओ दुबे यांना अटक
2 महराष्ट्रात दुर्मिळ अशा ब्लॅक पँथरचे दर्शन
3 “देशातील जनता मनकवडी, हे मोदींनी ठरवून टाकलंय”; शिवसेनेचा मोदींवर टीकेचा बाण
Just Now!
X