28 November 2020

News Flash

लक्ष्मण माने यांना चौथ्या गुन्ह्य़ात पोलीस कोठडी

महिलांच्या लैंगिक छळप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना चौथ्या गुन्ह्य़ासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी सुनावण्यात आली. माने व त्यांना या कृत्यात

| April 27, 2013 04:17 am

महिलांच्या लैंगिक छळप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेले माजी आमदार लक्ष्मण माने यांना चौथ्या गुन्ह्य़ासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी सुनावण्यात आली. माने व त्यांना या कृत्यात मदत करणाऱ्या मनीषा गुरव यांचा अटकपूर्व जामीनअर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
साताऱ्यातील शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सहा महिला कर्मचाऱ्यांनी माने यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केलेली आहे. याप्रकरणी एकेका गुन्ह्य़ात माने यांना अटक करून तपास केला जात आहे.
९ एप्रिलपासून लक्ष्मण माने पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना आत्तापर्यंत तीन गुन्ह्य़ात वेगवेगळ्या वेळी ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी त्यांना चौथ्या गुन्ह्य़ात पुन्हा अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 4:17 am

Web Title: police costudy to laxman mane in forth crime
टॅग Laxman Mane,Outrage
Next Stories
1 इंडियाबुल्सच्या दडपशाहीविरोधात मंगळवारी डाव्या आघाडीचे आंदोलन
2 काळू धरण प्रकल्पास ‘ना हरकत’
3 सार्वजनिकीकरणामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या
Just Now!
X