पिंपरी चिंचवडमधील भोसरी पोलिसांना सध्या शेळ्यांवर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात दिनकर काळे या मेंढपाळाने ११ शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी शोध मोहिम राबवली. तपासा दरम्यान पोलिसांना ३२ शेळ्या मिळाल्या. यामध्ये काही मेंढ्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर या संपूर्ण शेळी चोरीमागे चार अल्पवयीन मुलांचा हात असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. एका अल्पवयीन आरोपीचे मटणाचे दुकान आहे. त्यामुळे तो त्याच्या तीन साथीदारांसह शेळ्या-मेंढ्या चोरायचा आणि मौज-मजा करण्यासाठी मित्रांना पैसे द्यायचा.

या प्रकरणातले दोन अल्पवयीन आरोपी अंमली पदार्थांचे सेवन करायचे अशीही माहिती समोर आली आहे. या चार अल्पवयीन आरोपीनि भोसरी लांडेवाडी,कासारवाडी,म्हाळुंगे अश्या ठिकाणाहून या शेळ्या चोरी केल्या आहेत.दरम्यान या शेळी चोरी प्रकरणात दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.मात्र मौज मजा करण्यासाठी पैसे नसल्याने त्याने शेळी चोरीच्या प्रकारात सहभाग घेतला आणि तोच पोलिसांच्या जाळ्यात सापडला.त्याला मुख्य आरोपीने ८०० रुपये दिले आहे.त्याचे वडील हे रिक्षा चालक आहेत तर पूर्वी भंगराचा व्यवसाय करत होते.