News Flash

कोल्हापूरात अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण; पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे कृत्य

आरोपी मुलीने पीडित मुलाला चटके देखील दिल्याचे उघड झाले

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापूरमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलीने पीडित मुलाला चटके देखील दिल्याचे उघड झाले असून गुन्हा दाखल होताच मुलगी व तिचे कुटुंबीय फरार झाले आहेत.

कोल्हापूरमधील ताराबाई पार्क येथे राहणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने २०१२ मध्ये लहान मुलाला घरी आणले होते. पोलीस अधिकाऱ्याच्या सतरा वर्षांच्या मुलीने त्या मुलाचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तिने लायटर तसेच हेअर स्ट्रेटनरच्या मदतीने त्याला चटके दिले. घरी कोणी नसताना तिने त्या मुलाचे डोके भिंतीवर आपटणे, त्याला जिन्यावरुन ढकलणे असे प्रकारही केले होते. चाईल्डलाईन संस्थेच्या सदस्यांनी पीडित मुलाची सुटका केली आणि हा प्रकार समोर आला.
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पीडित मुलाला त्याच्या आईशी भेटूदेखील दिले नाही. तसेच त्याला शाळेत देखील पाठवले नाही, असा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पीडित मुलाचे समुपदेशन सुरु असून तो उपचारांना प्रतिसाद देत आहे. या धक्क्यातून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा सर्व प्रकार १० दिवसांपूर्वीच समोर आला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असा आरोप सामाजिक संघटनांनी केला आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याने पोलिसांनी कारवाईत दिंरगाई केली का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुलीविरोधात भारतीय दंड विधानातील कलम ३२६ (गंभीर दुखापत करणे), बालन्याय अधिनियम कलम ७५, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 10:42 am

Web Title: police officer daughter booked in sexual harassment of minor boy in kolhapur
Next Stories
1 अकोल्यात ११ सिलिंडरच्या स्फोटांमुळे अग्नितांडव
2 रामदेव बाबांचा काळे झेंडे दाखवून निषेध
3 छिंदम प्रकरणावरून शिवसेना-भाजप सदस्यांत खडाजंगी
Just Now!
X