मालेगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षाच्या आवारात उपनिरीक्षक अजझर शेख (४०) यांनी गोळी झाडून घेत आत्महत्या केली. कर्तव्यावर असताना स्वतःच्या सेवा पिस्तुलातून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली.
शेख हे पोलीस उप अधीक्षक कार्यालयातील वाचक म्हणून कार्यरत होते. नियंत्रण कक्षात शनिवारी सायंकाळी करोनाच्या पार्श्वभूमीवर, काही नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपअधीक्षक रत्नाकर नवले आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस अजहर शेख हेही उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर सर्व अधिकारी आपापल्या दालनात पोहोचले. त्यानंतर लगेचच साधारणतः पावणे पाच वाजेच्या सुमारास शेख यांनी स्वतःच्या पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेख यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2020 9:21 pm