राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. शासनाने बऱ्याचदा नियमावली जाहीर केली आहे. परंतु लोक सगळे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची गर्दी आवरताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ हे करोना विषाणुच्या प्रसाराची मुख्य ठिकाणे असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

कोविड -१९ रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासनाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक नियम जाहीर केल्या असून यामध्ये लग्न मंडपांमध्ये दिवसभरासाठी पोलिस कर्मचारी तैनात करणे व कार्यक्रमास ५० पेक्षा जास्त अतिथी आढळल्यास आयोजकांविरूद्ध घटनास्थळीच कारवाईचा समावेश आहे.

अहमदनगर जिल्ह्याला लागून असलेल्या पुणे व औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या काही आठवड्यांत कोविड -१९ प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे आणि कडक निर्बंध जाहीर करण्यात आला आहे. दररोज, ३५० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासन लोकांच्या हालचालींवर बंधने आणेल किंवा अंशत: लॉकडाउन लागू करेल अशी चर्चा सुरू झाली होती. तरी सोमवारी जिल्हाधिकार्यांनी सांगितले की आता नव्याने आळा घातला जाणार नाही परंतु आधीच अस्तित्त्वात असलेले निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी हे सांगितले.

भोसले म्हणाले की, जिल्ह्यात या आठवड्यात ४४ विवाह समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे, याठिकाणी स्थानिक पोलिस बारीक लक्ष ठेवतील.