News Flash

बिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू

कोरची येथून सात किलो मीटर अंतरावरील सोहले येथे पोलीस पाटील जुमेन कोटेंगे याच्यावर बिबटय़ाने हल्ला केला

अशक्त असल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे आता वन विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

गडचिरोली : कोरची येथून सात किलो मीटर अंतरावरील सोहले येथे पोलीस पाटील जुमेन कोटेंगे याच्यावर बिबटय़ाने हल्ला केला असता त्यांच्यात पंधरा ते वीस मिनिटे झटापट झाली. यात पोलीस पाटील गंभीर जखमी जाले तर बिबटय़ा मृत पावल्याची घटना आज येथे घडली.

जुमेन चमाजी काटेंगे (३५) हा सकाळी सहा वाजताच्या दरम्यान गावाबाहेर गेला होता. नेमका याच वेळी त्याच्यावर बिबटय़ाने हल्ला केला. दोघांमध्ये १५ ते २० मिनीट झटापट झाली. जुमेनच्या दोन्ही हातांना व गालाला ओरबडल्याने दुखापत झाली. दोघांचीही झटापट सुरू असताना तिथे जुमेनचा भाऊ पोहचला व बिबटय़ाच्या तावडीतून त्याने भावाला सोडविले. रक्तबंबाळ जुमेनला तात्काळ ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले. बिबटय़ाने जुमेनला जखमी केल्याची वार्ता गावात व आजूबाजूच्या परिसरात पसरली. बघता बघता हजारो लोक जमा झाले. यावेळी बिबट झाडीत लपून बसला होता. तो कुणावरही झडप मारू शकतो या भीतीने कुणीही तिकडे जात नव्हते. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गढवे यांना देण्यात आली. त्यानी लगेच वरिष्ठांना याबाबत कळविले. वन विभाग ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. फिरते वन पथक घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एम. भोसले हे देखील तिथे आले. यावेळी बिबटय़ाची चाचपणी करण्यात आली. मात्र बिबट काहीही हालचाल करीत नाही हे बघून वन कर्मचाऱ्यांनी बिबटय़ाला जीपमध्ये टाकले. मात्र तेव्हा बिबट मृत पावला होता. मृत बिबट हा एक ते दीड वर्षांचा होता. आईपासून काही महिन्यापूर्वीच दुरावला होता. जंगलातून बिबटय़ाचे खाद्य नाहीसे झाल्याने त्याची प्रकृतीही थोडी नाजूकच होती. तो अशक्त असल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे आता वन विभागाचे अधिकारी सांगत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:22 am

Web Title: police patil injured in leopard attack in gadchiroli district
Next Stories
1 नाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी
2 आखाडा, आकडे आणि अस्वस्थता
3 मगरीने केलेल्या हल्ल्यात सांगलीत मुलगा बेपत्ता
Just Now!
X