News Flash

VIDEO: बीडमध्ये भिकाऱ्याची १ लाख ७२ हजारांची रक्कम लंपास; पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला शोध

एका भिकाऱ्याकडे एवढी मोठी रक्कम मिळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे

परळी शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागणाऱ्या एका भिकाऱ्याची १ लाख ७२हजारांची चोरी गेलेली रक्कम परळी पोलिसांनी अवघ्या काही तासात मिळवून दिली. बाबुराव नाईकवाडे हे मागील अनेक वर्षांपासून वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र करोनामुळे मंदिर बंद असल्याने अनेक भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात आयुष्यभर जमा केलेली रक्कम चोरट्याने लंपास केल्याने नाईकवाडे चिंताग्रस्त झाले होते.

अशातच परळी पोलीस नाईकवाडेंच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी अवघ्या काही तासातच त्यांना चोरीला गेलेली रक्कम मिळवून दिली.

एकीकडे कोरोनाचं संकट असल्यानं अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात या परिस्थितीत एका भिकाऱ्याकडे मात्र मोठी रक्कम मिळून आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 4:04 pm

Web Title: police recovered money stolen from begger in beed sgy 87
Next Stories
1 Maharashtra Covid 19: या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; कोव्हिड केंद्रातच व्हावं लागणार दाखल
2 “फडणवीसांना मला सल्ला द्यायचाय”; उदय सामंतांनी व्यक्त केली नाराजी
3 “मोदींनी टीव्हीवर येऊन रडू नये; आता तर त्यांचे भक्तही ऐकणार नाहीत”