News Flash

महिलेची अश्लील चित्रफीत बनवून २० लाख उकळले

दोन महिलांसह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

यवतमाळच्या पुसद शहरातील एका महिलेची बनावट अश्लील चित्रफीत तयार करुन सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन ३० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यापैकी २० लाखांची रक्कम पीडित महिलेकडून उकळल्यानंतर, पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पुसद शहर पोलिसांनी दोन महिलांसह एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गौरव गायकवाड, कमल पाईकराव अशी आरोपीचं नाव असून गौरवच्या घरातील एका महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुसद शहरात उदासी वॉर्डात राहणाऱ्या पीडीत महिलेची बनावट अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओ तयार करुन आरोपींनी तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली. पैसे न दिल्यास सोशल मीडियावर ही छायाचित्र टाकून बदनामी करु अशी धमकीही दिली. ३० लाखांची खंडणी मागितल्यानंतर महिलेने २० लाख रुपये दिले, मात्र यावर आरोपींचं समाधान झालं नाही. आरोपींनी पीडित महिलेला एका निर्जन स्थळी बोलवून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

अखेरीस पीडित महिलेने पुसद पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 10:00 pm

Web Title: police registered complaint against 3 persons in yavatmal for blackmailing women psd 91
Next Stories
1 “पालघर जिल्ह्याचा मृत्यूदर खाली आणण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवणार”
2 रायगडमध्ये करोनामुळे १६ मृत्यू, तर ६१५ नवे रुग्ण
3 वर्धा: करोना बळींच्या अंत्यसंस्कारांचे पैसे उकळण्याचा प्रकार उघड
Just Now!
X