News Flash

५ लाख रूपयांच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक

सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांची पिंपरीमध्ये कारवाई

पाच लाखांच्या जुन्या नोटा पकडल्या

पिंपरी चिंचवडमधल्या एम्पायर इस्टेटजवळ पाच लाखांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवडच्या डीबी टीमनं ही कारवाई केली आहे. जवाहर गोगिया हा ६० वर्षांचा माणूस आपल्या दुचाकीतून पाच लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा घेऊन येतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी सापळा रचून जवाहरला अटक केली आहे. पिंपरी पोलिसांच्या डीबी टीमनं ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महावीर चौकात जवाहर नोटा बदलण्यासाठी येणार होता. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये पाच लाखांच्या नोटा होत्या. एम्पायर इस्टेट भागात असलेल्या शनी मंदिराजवळ जवाहर दलालाला भेटून नोटा बदलणार होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी जवाहरला अटक केली आणि त्याच्या दुचाकीत असलेल्या पाच लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्या.

या नोटा पाचशे रूपयांच्या आहेत. जुन्या नोटा पकडण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. विशेष बाब म्हणजे शुक्रवारी अशाच प्रकारे मुंबईत नोटा बदलण्यासाठी गेलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उर्से टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या तिघांकडून २ कोटी ९० लाखांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 9:51 pm

Web Title: police seized 500 rs old note arrested one person in pimpri
Next Stories
1 उद्योगपतींना सहज कर्जमाफी देता, मग शेतकरी कर्जमाफीची चर्चा का?-शरद पवार
2 दहावीत असताना शरद पवारांवर निबंध लिहीला होता-पंकजा मुंडे
3 रायगडातील वर्षांसहली जीवघेण्या ठरतायत
Just Now!
X