24 November 2020

News Flash

राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न- राधाकृष्ण विखे

राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या

माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्योग क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या उद्योजकांचा गौरव विरोधी पक्षनेते विखे यांच्या हस्ते करण्यात आला.

राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता विश्वासार्हता वाढविणे ही त्यांच्यापुढे मोठी जबाबदारी असून सामान्य माणसाशी त्यांचा योग्य संवाद राहिला पाहिजे. त्यातूनच सामाजिक सलोखा टिकून राहील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.

माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बेलापूर खुर्द येथील केशव गोिवद बनात पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच उद्योग क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या उद्योजकांचा गौरव विरोधी पक्षनेते विखे यांच्या हस्ते करण्यात आला. तनपुरे कारखान्याचे माजी संचालक व्दारकानाथ बडधे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे, बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार, केशव गोिवद विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब पुजारी, बाळकृष्ण कोळसे, सुधीर नवले, बी. के. बकाल, सुनिल मुथ्था, सरपंच अनुराधा गाढे, उपसरपंच सविता राजळे आदी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते विखे यांच्या हस्ते पोलीस उपाधीक्षक अरुण जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, उपनिरीक्षक अन्सार शेख, उद्योजक सारंगधर निर्मळ, गणेश भांड, डॉ. बाळासाहेब बारहाते, सतीश भगत, अशोक भगत, यांचा गौरव करण्यात आला.

विखे पुढे म्हणाले की, खासदार बाळासाहेब विखे यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या कार्यकर्त्यांकडून होत असलेला सत्कार आहे. चांगले काम करणाऱ्यांना खासदार विखे यांनी सदैव प्रोत्साहन दिले. त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्याचे काम केले. त्यांच्या विचारांचा हा वारसा बेलापूर खुर्द येथील कार्यकत्रे जोपासत असल्याचे मोठे समाधान आहे. अशा कार्यक्रमातूनच सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे काम होईल. चांगल्या माणसांचा सन्मान केला तर, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. तरुण पिढीलाही या सत्कारातून नवी प्रेरणा मिळते.

गौरव करण्यात आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या सत्काराचा संदर्भ देऊन, विखे म्हणाले की, आव्हानांचा सामना करत पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी जनतेसाठी काम करत असतात. आज मूठभर लोकांच्या चुकांमुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस प्रशासनाबद्दल विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला जनतेशी चांगला सुसंवाद ठेवावाच लागेल. चांगले पोलीस अधिकारी त्यांच्या सत्कर्माने पुढे वाटचाल करतात. नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण करतात. सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही सर्वाचीच आहे. आपल्या जिल्ह्याच्या भूमीला संतांचा विचार मिळाला, सहकाराची समृध्दी मिळाली. त्यामुळे येथील वातावरण चांगले राखण्यात आपल्याला यश येत आहे. जिल्ह्यातील उद्योजकांनाही स्वकष्टातून उद्योग उभारून रोजगाराची निर्मिती केली. या कार्यक्रमात सत्कार करण्यात आलेल्या सर्वच उद्योजकांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. या उद्योजकांचा आदर्श घेऊन, युवकांनी पुढे जाण्याचे आवाहन विखे यांनी केले.

आमदार कांबळे म्हणाले की, बाळासाहेब विखे यांनी आपल्या कामाचा ठसा देशभर उमटविला. चांगले अधिकारी व उद्योजक यांना त्यांनी सदैव प्रोत्साहन दिले. या परिसराचा सर्वागीण विकासा साधण्याचे काम झाल्यामुळेच त्यांच्या कार्याच्या आठवणी सर्वाच्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक अरुण जगताप, सुनिल मुथ्था यांची भाषण झाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 2:47 am

Web Title: political interference hit credibility of police says radhakrishna vikhe patil
Next Stories
1 नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात आठवलेंच्या भाषणाला विरोध
2 ‘मुंबईतील दुर्घटनांबाबत मौन बाळगणारे पंतप्रधान १४ गुजराती व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर लगेच ट्विट करतात’
3 शिवजयंती तिथीप्रमाणेच साजरी करावी; शिवसेना घालणार मुख्यमंत्र्यांना साकडं!
Just Now!
X