News Flash

लोकशाहीच्या मंदिरात येण्याची संधी न मिळणाऱ्यांसाठी राजकीय आरक्षण आवश्यक – मुख्यमंत्री

अनुसुचित जाती-जमातीच्या राजकीय आरक्षणाला पुढील दहा वर्षांसाठी केंद्र सरकारने १२६व्या घटनादुरुस्तीद्वारे मुदतवाढ दिली आहे. या विधेयकाला राज्य विधानसभेत मंजुरी देण्यात आली.

संग्रहीत

ज्या समाजाला लोकशाहीच्या मंदिरात येण्याची संधी मिळत नाही त्यांच्यासाठी राजकीय आरक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पुढील दहा वर्षांसाठी अनुसुचित जाती-जमातीच्या राजकीय आरक्षणाला केंद्र सरकारने १२६ वी घटनादुरुस्ती करुन मुदतवाढ दिली आहे. या विधेयकाला बुधवारी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मंजुरी देण्यात आली.

यासंबंधीचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, “ज्या जातीतील, वंशातील लोक गरीब आहेत त्यांना लोकसभेच्या मंदिरात येण्याची संधी मिळत नाही. अशा लोकांना या राजकीय आरक्षणाची गरज आहे. या सगळ्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणे गरजेचे आहे. हे विधेयक समजातील सर्व घटकांना संधी देणारं विधेयक आहे. त्यामुळे मी या विधेयकाच स्वागत करतो.” पुढील दहा वर्षात हा समाज सर्वांच्या बरोबरीनं आला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करताना ज्यांच्या विचाराने हा देश चालला आहे, तो पुढारलेला महाराष्ट्र पुढच्या दहा वर्षात आणखी नावारुपाला येईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री व्यक्त केला.

आरक्षणाची व्यवस्था विषमतामुक्त समाज निर्मितीसाठी – फडणवीस

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. तसेच या आरक्षणावर आपली भुमिका मांडताना म्हणाले, आरक्षणाची व्यवस्था नोकरी, शिक्षणापुरती नाही तर विषमतामुक्त समाज निर्माण करण्यासाठी उभी करण्यात आली आहे. हे केवळ भारतातच नव्हे तर जगात ज्यांना समतापूर्ण समाज निर्माण करायचा त्या सर्व देशात वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी करुन दिला मंत्र्यांचा परिचय

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांचा यावेळी सभागृहाला परिचय करुन दिला. या अधिवेशनाला काँग्रेसचे नाराज मंत्री विजय वडेट्टीवार अनुपस्थित राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2020 12:17 pm

Web Title: political reservation is essential for those who do not have the opportunity to enter the temple of democracy says cm udhav thackeray aau 85
Next Stories
1 प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती रद्द
2 ..तर आमच्या पदव्यांची चौकशी करा : उदय सामंत
3 सकाळी निरुत्साह, दुपारनंतर रांगा
Just Now!
X