ना प्रचाराची लगीनघाई, ना स्पीकरचा बोलबाला, ना पोस्टरयुध्द सगळे शांत शांत. तासगाव-कवठे महांकाळ पोटनिवडणुकीस आता केवळ आठ दिवस उरले तरी अजून प्रचाराचा रंग कुठेही भरलेला दिसत नाही. रसद नसल्याने कार्यकत्रे हातचे राखूनच प्रचारात असल्याने यंदाच्या निवडणुकीत राजकारणाचा खरा रंग अद्याप भरलेलाच नाही.
तासगाव पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे आठ दिवस राहिले असले तरी अद्याप प्रचाराची रंगत काही आलेली नाही. एकतर्फी निवडणूक होणार असे जरी चित्र दिसत असले तरी गट शाबूत ठेवण्यासाठी भाजपाच्या नेत्यांचा आटापिटा सुरू आहे. प्रचारात जान आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार रविवारी तासगाव व कवठे महांकाळमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.
तासगाव पोटनिवडणुकीसाठी आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याविरूध्द िरगणात ९ उमेदवार असले तरी खरी लढत भाजपाचे कार्यकत्रे स्वप्निल पाटील यांच्याशीच होत आहे. ते प्रचारात, भाजपाने अजितराव घोरपडे यांना डावलल्याने आपण निवडणूक लढवित असल्याचे सांगत मतदार संघाचा खुंटलेला विकास साध्य करण्यासाठी आणि आबांच्या म्हणण्यानुसार घराणेशाहीपासून असलेला धोका रोखण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.   
राष्ट्रवादीच्या सुमन पाटील यांच्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी न देता पािठबा दिला. मात्र भाजपाने वरिष्ठ पातळीवरून घेतलेला हा निर्णय गावपातळीवरील कार्यकर्त्यांना रूचलेला नाही. यामुळे प्रचारापासून अलिप्तच राहण्याचा निर्णय बहुसंख्य कार्यकर्त्यांनी घेतला आहे. श्रीमती पाटील यांच्या गावभेटीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मंगळवारी त्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील काही गावाना भेटी दिल्या. या वेळी कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा तसा जोर दिसून आला नाही.
 भाजपाचे कार्यकत्रेही या प्रचारापासून अलिप्तच आहेत. रसद नसल्याने राष्ट्रवादीचे कार्यकत्रे शांत आणि पटत नाही म्हणून विरोधकही शांत यामुळे ही पोटनिवडणुक इलेक्शन फिव्हर’विना होत आहे. कार्यकर्त्यांत जोश भरण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदान मिळावे यासाठी आता पक्षाचे नेते अजित पवार रविवारी तासगावात येत आहेत. त्यानंतर तरी कार्यकर्त्यांची मरगळ दूर होणार का हा प्रश्नच आहे.