News Flash

…त्यामुळेच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला; संजय राठोडांनी मांडली भूमिका

राजीनामा देण्याआधी काय घडलं?

संग्रहित छायाचित्र

पूजा चव्हाण प्रकरणातून अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी राठोड यांनी सपत्नीक भेट घेतली. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर राठोडांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राठोड यांनी माध्यमांसमोर येत राजीनामा देण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून विरोधी पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माझी, माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकारणातून उठवण्याचाही प्रकारही झाला,” असं राठोड यांनी म्हटलं आहे.

“गेल्या तीस वर्षात सामाजिक, राजकीय क्षेत्रात मी जे काम केलं आहे, ते उद्ध्वस्त करण्याचं काम झालं आहे. मी आधीही हे बोललो. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, अशीच माझी मागणी आहे. मी बाजूला राहून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी भूमिका आहे. सत्य बाहेर यावं. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे. त्यामुळेच मी राजीनामा दिला आहे,” असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं.

राजीनामा देण्याआधी काय घडलं?

राठोडांवर कारवाई न केल्यास अधिवेशनाचं कामकाज चालवू देणार नाही, असा इशारा विरोधीपक्ष असलेल्या भाजपानं दिला होता. उद्यापासून अधिवेशन सुरू होतं असून, आज (२८ फेब्रुवारी) संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संजय राठोड हे पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. यावेळी चर्चा झाली. राठोड यांनी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली तसेच त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 4:18 pm

Web Title: pooja chavan suicide case sanjay rathod first reaction after resignation bmh 90
Next Stories
1 संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 शिवसेना बलात्कार करणाऱ्यांना, खून करणाऱ्यांना पाठिशी घालते – नारायण राणे
3 मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा
Just Now!
X