News Flash

घडामोडींना वेग! संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

संग्रहित छायाचित्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापलं असून, या प्रकरणात नाव आल्यामुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत आल्याचं चित्र आहे. विरोधकांकडून सातत्यानं संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. संजय राठोड हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले असून, भेटीत काय निर्णय होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्यावर आरोप झाले. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं सरकारला या प्रकरणावरून पूर्णपणे कोडींत पकडले असून, राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याचं बोललं जात आहे. अधिवेशन काळात विरोधकांकडून सरकारची कोडीं होण्याची भीती असल्यानं राठोडांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो, असंही बोललं जात असतानाच आज (२८ फेब्रुवारी) संजय राठोड सपत्नीक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्याचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षानिवासस्थानी दाखल झाले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्याआधीच संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यानं राजीनामा देण्याची शक्यता बळावली आहे. मुख्यमंत्री आणि संजय राठोड होण्याआधी सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत राजीनाम्यासंदर्भात अप्रत्यपणे संकेत दिले होते. राऊतांच्या ट्विटची चर्चा होत असतानाच राठोड वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. आता मुख्यमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेणार की, चौकशी नंतर निर्णय घेणार हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 2:29 pm

Web Title: pooja chavan suicide case sanjay rathod reached varsha residency bmh 90
Next Stories
1 … म्हणून राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे – फडणवीस
2 आदित्य ठाकरेंनी मला मराठी शिकवावी; ब्रिटनच्या मुंबईतील राजदूतांची विनंती
3 संजय राठोड राजीनामा देणार?; शिवसेना नेते संजय राऊतांचं सूचक ट्विट
Just Now!
X