थंडीच्या दिवसांमध्ये कोकणामध्ये जिभेचे चोचले पुरवणारा एक प्रकार आवर्जून केला जातो, तो म्हणजे पोपटी. वाल, पावटे आदींचं मुबलक उत्पादन या काळात येतं. सणासुदीचा माहोल अजून संपलेला नसतो आणि गुलाबी थंडीमध्ये काहीतरी झणझणीत खावं अशी इच्छाही असते. मग, जगातल्या कुठल्याही नामांकित हॉटेलमध्ये मिळणार नाही अशी चविष्ट पोपटी कोकणातल्या गावागावांमध्ये बनते.

three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Rahu Shukra Yuti in meen rashi
विपरीत राजयोगामुळे दहा दिवसांमध्ये ‘या’ तीन राशींचे बदलणार नशीब , मिळणार गडगंज पैसा
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

मडक्यामध्ये केळीची पानं लावली जातात, तळाशी भांबुर्डी किंवा भामरुटाचा पाला पसरला जातो. वालाच्या शेंगा, पावटे, भाज्या, बटाटे, ओवा, मसाला, हळद, मांसाहारी असतील त्यांच्यासाठी मासे वा चिकनचे तुकडे असं सगळं या मडक्यात ठेवले जातात. पुन्हा भांबुर्डीच्या पाल्यानं मडक्याचं तोंड बंद केलं जातं. नंतर जमिनीत खड्डा खणून मडकं चांगलं आगीवर शेकलं जातं. तास दीडतासात अत्यंत खमंग अशी पोपटी तयार होते. एकेकाळी फक्त गावकरी एकत्र येऊन करायचे अशा या पोपटीच्या आता पार्ट्या आयोजित केल्या जातात. तुम्हाला येते का अशीच पोपटीची एखादी पाककृती? असेल तर जरूर सांगा सगळ्यांना.

पोपटी किंवा अशीच एखादी पाककृती आपल्यापुरती मर्यादीत न ठेवता ती लोकसत्ता डॉट कॉमच्या माध्यमातून जगाला कळू द्या. ही तुमची पाककृती केवळ सगळ्यांपर्यंत पोचेल इतकंच नाही, तर तुमच्या या खास पाककृतीसाठी आकर्षक बक्षीस जिंकण्याचीही संधी तुम्हाला मिळणार आहे.

‘लोकसत्ता ऑनलाइन’ने एका खास स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये तुम्ही आपल्या रेसिपी पाठवू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी सहज म्हणून ट्राय केलेली ही रेसिपी तुम्हाला बक्षीस तर मिळवून देईलच, पण ती रेसिपी अनेकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही मदत करेल. या स्पर्धेत जिंकलेल्या भाग्यवान विजेत्याला कुटुंबासह गोव्यामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. याबरोबरच आठवड्याला आणखीही खास बक्षीसे मिळणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. या माध्यमातून तुम्ही तुमच्या भागात प्रसिद्ध असणारी, परंतु देशातल्या अन्य लोकांना अपरिचित असलेली मोदकाची आणि इतरही पाककृतीही जगभरात पोहोचवू शकणार आहात.

प्रेस्टिज सहप्रायोजक असलेल्या या पाककला स्पर्धेचे ग्रेटर बँक गोल्ड लोन हे बँकिंग पार्टनर आहेत. चला तर मग या खास पाककला स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमच्यातल्या पाककलेच्या कौशल्याला वाव द्या! सहभागासाठी भेट द्या: indianexpress-loksatta.go-vip.net/paakkala