पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारपासून जोरदार पाऊस होईल. घाट भागात तर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणेकर हे उकाड्याने हैराण झाले आहेत. अशात ही बातमी या सगळ्यांनाच दिलासा देणारी ठरली आहे. सगळेच जण पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत.

 

१ ते ५ ऑगस्ट दरम्यान कोणत्या जिल्ह्यात पावसाची कशी स्थिती असेल?

पालघर १ आणि २ ऑगस्ट
लघू ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
३ ते ५ ऑगस्ट
मुसळधार पाऊस काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस

ठाणे
१ आणि २ ऑगस्ट
लघू ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

३ ते ५ ऑगस्ट
मुसळधार आणि अति मुसळधार पाऊस
मुंबई<br />१ ऑगस्ट
हलक्या सरी

२ ऑगस्ट
ठराविक भागांमध्ये मुसळधार सरी

३ ते ५ ऑगस्ट
मुसळधार ते अति मुसळधार पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असल्याने सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यासह आता रत्नागिरीतील पाऊसही सरासरीच्या तुलनेत मागे पडत आहे. मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे. अशात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे दिलासा मिळू शकतो.

विदर्भात दोन-तीन जिल्हे वगळता सर्वच भागांत पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे आहे. मराठवाड्यात मात्र पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे. मुंबई परिसर, कोकणातील काही भाग आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठय़ातील वाढ थांबली असून, शेतकऱ्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.अशात हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज हा दिलासा देणारा आहे.