News Flash

सेनेच्या पोस्टर ‘वॉर’ ची पालकमंत्र्यांकडून खिल्ली!

पालकमंत्र्यांनी ५ वर्षांत विकासाची कोणती कामे केली, असा प्रश्न करीत बहुतांशी सत्ता पदे क्षीरसागर कुटुंबीयांनी आपल्याकडेच कशी ठेवली, असे फलक चौका-चौकात लावून शिवसेनेने पालकमंत्री

| August 26, 2014 01:25 am

पालकमंत्र्यांनी ५ वर्षांत विकासाची कोणती कामे केली, असा प्रश्न करीत बहुतांशी सत्ता पदे क्षीरसागर कुटुंबीयांनी आपल्याकडेच  कशी ठेवली, असे फलक चौका-चौकात लावून शिवसेनेने पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर पोस्टर ‘वॉर’ केला. निवडणूक तोंडावर होणारी उद्घाटने ‘लॉलीपॉप’ असल्याची खरमरीत टीका सेनेने केली. मात्र, आम्ही लॉलीपॉप देत नाही, तर कामे पूर्ण करतो. पण ज्यांना बीड ते पनवेल लॉलीपॉप लागतात, ते टीका करण्याशिवाय दुसरे काय करणार, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यावर पलटवार केला.
बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून पालकमंत्री क्षीरसागर व महायुतीकडून शिवसेना जिल्हाप्रमुख जगताप यांनी प्रचारयुद्ध सुरू केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागरांनी मागील १५ दिवसात विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला. आचारसंहिता काही दिवसात लागण्याची शक्यता गृहीत धरून सेनेनेही मेळावे घेत क्षीरसागरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. जिल्हाप्रमुख जगताप यांनी शहरातील प्रमुख चौकात क्षीरसागर कुटुंबीयांवर टीका करणारे फलक उभारले. स्वत मंत्री, भाऊ अध्यक्ष, भावजय नगराध्यक्षा, पुतण्या सभापती मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलायच्या का, असा थेट सवाल करीत पाच वर्षांत शहराला वळण रस्ता करू न शकणाऱ्यांना मत देणार का, अशी टीका करीत सेनेने रान पेटवले.
बसस्थानक उद्घाटन कार्यक्रमात नामोल्लेख टाळून क्षीरसागर यांनी जगताप यांच्यावर पलटवार केला. ज्यांना बीड ते पनवेल लॉलीपॉप लागतात, ते काहीच काम करू शकत नाहीत. ते आमच्यावर केवळ टीकाच करणार, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 26, 2014 1:25 am

Web Title: poster war of shivsena
टॅग : Beed
Next Stories
1 विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये ‘अ‍ॅफ्प्रो’चा स्वच्छ पाणी, आरोग्यावर भर
2 शेकडो वनकर्मचाऱ्यांच्या संपामुळे ताडोबातील व्यवस्थापन कोलमडले
3 आंबोलीच्या दरीत पडलेल्या युवकाचा मृतदेह सापडला
Just Now!
X