सायिझग-वाìपग कामगारांनी पुकारलेल्या बंदमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी मंगळवारी बोलविलेली बैठक सायिझग कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने बठक निष्फळच ठरली. हा संप आणखीन काही दिवस लांबल्यास हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.
सुधारित किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या दोन आठवडय़ापासून सायिझग-वाìपग कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या संपाचा परिणाम हळूहळू वस्त्रोद्योगातील घटकावर होऊ लागला असून एक एक व्यवसाय बंद होऊ लागले आहेत. यंत्रमागधारकांनी तर एक पाळी बंद ठेवली असून संपामुळे दैनंदिन होणारी कोटय़वधीची उलाढाल ठप्प झाली आहे.
संपाच्या पाश्र्वभूमीवर प्रांताधिकारी सौ. अश्विनी जिरंगे यांनी दुपारी आज संयुक्त बठकीचे आयोजन केले होते. पण सकाळीच सायिझगधारकांनी प्रांताधिकारी जिरंगे यांनी भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. किमान वेतनाचा प्रश्न न्याय प्रवीष्ट असून या संदर्भात सध्या तरी आम्ही आपली भूमिका मांडू शकत नाही. कामगार प्रतिनिधी बठकीत एक बोलतात तर बाहेर जाऊन कामगारांसमोर दुसरेच बोलतात, असा आरोप करुन संघटनेची त्यांच्याशी कसलीही चर्चा करण्याची तयारी नसल्याचे सांगितले. यावेळी संतोष कोळी, वसंत पाटील, प्रकाश गौड, दिलीप ढोकळे, बंडोपंत लाड यांच्यासह सायिझगधारक उपस्थित होते.
दुपारच्या सुमारास लालबावटा सायिझग-वाìपग कामगार प्रतिनिधी बठकीस उपस्थित राहिले. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना कामगार प्रतिनिधींनी न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शासनाने जाहीर केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडली नाही तर आम्हांला प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला. या वेळी कामगार नेते ए. बी. पाटील, आनंदा चव्हाण, सुभाष निकम, कृष्णात कुलकर्णी आदींसह कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
बठकीवेळी पोलिस उपाधीक्षक विनायक नरळे, पो.नि. संजय साळुंखे, सतिश पवार, सपोनि देशमुख, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
सायिझग मालक व कामगार प्रतिनिधी आपापल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने या प्रश्नाची सोडवणूक करताना प्रशासनाची दमछाक होत असून कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे सायिझग कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघणार की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. हा संप आणखीन काही दिवस चालल्यास संपूर्ण वस्त्रोद्योगावर त्याचा परिणाम होऊन कामगार बेकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.