28 February 2021

News Flash

पावणेदोन कोटींची वीजचोरी

वसई-विरारमध्ये एक हजाराहून अधिक प्रकरणे

वसई-विरारमध्ये एक हजाराहून अधिक प्रकरणे

कल्पेश भोईर , लोकसत्ता

वसई : वसई-विरार शहरात आकडे टाकून, मीटरमध्ये फेरफार, अनधिकृत वीज वापर अशाप्रकारे वीजचोरी होऊ लागली आहे. शहरात सुमारे पावणेदोन कोटींची वीजचोरी उघडकीस आली आहे. मागील दहा महिन्यांत एक हजार २१३ वीजचोरीचे प्रकार घडले आहेत.

अशा वीज चोरांना आवर घालण्यासाठी करोनाकाळ निवळताच वसई-विरारमध्ये धाडसत्र सुरू  केले होते. यामध्ये एप्रिल ते जानेवारी या दरम्यानच्या कालावधीमध्ये वसई-विरारमध्ये ६३४ ठिकाणी आकडे टाकून चार लाख ८८ हजार युनिटची चोरी झाल्याचे समोर आले. यामध्ये ८४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मीटरमध्ये फेरफार करणारी २९५ प्रकरणे समोर आली आहेत. जवळपास चार लाख ४३ हजार युनिटची चोरी उघड झाली आहे. अनधिकृतपणे विजेचा वापर करणारे  २८४ ठिकाणी चार लाख ५३३ युनिटची चोरी झाली. अशा तिन्ही प्रकरणांत महावितरणच्या विशेष पथकांनी सुमारे  १ कोटी ८५ लाख १४ हजार ७०० रुपये इतक्या रक्कमेची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या रक्कमेची वसुली करण्याचे कामही महावितरणकडून केले जात असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

वसुली आणि गुन्हे (एप्रिल ते जानेवारी)

’ आकडे टाकून वीजचोरी—

६२४ ठिकाणी ४ लाख ८८ हजार युनिट जवळपास ६८ लाख ३७ हजार रुपयांची वीजचोरी. त्यापैकी ११ लाख ६२ हजार वसूल  व ८४ जणांवर गुन्हे

’ मीटर फेरफार —

२९५ प्रकरणे ४ लाख ४३ हजार युनिट जवळपास ५८ लाख ७७ हजार ७०० रुपयांची वीजचोरी. त्यापैकी २० लाख ८७ हजार ७०० रुपये रक्कम वसूल

’ अनधिकृत वीजवापर-

२८४ ठिकाणी ४ लाख ५३३ युनिटचा जवळपास ५८ लाख रुपयांचा अनधिकृत वीजवापर. त्यापैकी ३ लाख ७२ हजार इतकी रक्कम वसूल केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:20 am

Web Title: power theft over 1 75 crore in vasai virar city zws 70
Next Stories
1 महिला प्रवाशावर हल्ला करणारा अद्याप मोकाट
2 करोना निधीतून वाहन खरेदी
3 मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम
Just Now!
X