पंचायत राज समितीच्या दौऱ्यानंतर जि. प.मध्ये अनेकांवर कारवाईचे गंडांतर येणार होते. मात्र, तसे घडलेच नाही. शिवाय आरोग्य विभागातील एक कर्मचारी १० वर्षांपासून गरहजर असताना त्याच्या सेवानिवृत्तीचे प्रकरण मार्गी लागण्याबरोबरच अनेक कामे नियम वाकवून पुनस्र्थापित करण्याचा प्रकारही घडला. सर्वानाच खूश ठेवण्यासाठी काम करणे व न करणे असे दोन्ही प्रकार घडत असल्याने ‘प्रभारीराज’मुळे जि. प.मध्ये हर्षोल्हासाचे वातावरण आहे.
जि. प.मध्ये आयएएस अधिकारी आला की, नियम वाकविणे सोपे नसते, याच प्रकारामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रेखावार यांच्यावर अविश्वास ठराव आला. तत्पूर्वी अनेकांवर असा प्रयोग झाला. इतकेच नाही, तर जे अधिकारी पदाधिकाऱ्यांची मर्जी राखत नाहीत, अशांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे प्रस्ताव सभागृहाने यापूर्वी मंजूर केले.
रेखावार यांच्या बदलीमुळे येथे प्रभारी म्हणून एस. डी. कपाळे यांच्याकडे पदभार आहे. मागील काही दिवसांत पंचायत राज समिती दौऱ्यानिमित्त कारवाईबाबतचे काम थंड बस्त्यात गेले. शिवाय रेखावार यांच्या काळात काढलेले अनेक आदेश सोयीनुसार बदलले गेले, तर काहींची अंमलबजावणी होऊ दिली जात नाही. त्यामुळेच वित्त विभागातील बदल्या पदोन्नतीच्या नावाखाली थांबल्या आहेत. एकाच वर्षी महिला व बालकल्याणच्या योजनेत दोन लाभ घेणारे किरकोळ कारवाईवर मोकळे आहेत.
विशेष म्हणजे जि. प. आरोग्य विभागातील कर्मचारी पी. एन. ठाकूर गेले १० वर्षे कार्यालयात गरहजर असताना त्यांच्या सेवानिवृत्तीबाबत प्रथम कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याची सूचना करण्यात आली. आता मात्र त्यांच्या सेवानिवृत्तीला मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू असल्याने हाही चच्रेचा विषय बनला आहे. पदाधिकारीही हल्ली मजेत आहेत. रेखावार येथे असताना जि. प. कार्यालयच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातील शाळा व आरोग्य विभागांतील कर्मचारी कामचुकारपणा करण्याची िहमत करीत नव्हते. आता तर कोणाचा कोणावर वचक नसल्याने कर्मचाऱ्यांना मोकळे रान मिळत आहे. पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या होकारास होकार देणारे अधिकारी असल्याने हा हर्षोल्हास असल्याची जि. प. वर्तुळात चर्चा आहे.