News Flash

प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अध्यासन केंद्र सुरू करणार – उदय सामंत

३ हजार ६३५ पैकी २ हजार ७६४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असल्याचेही सांगितले.

संग्रहीत

शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू केले जाणार आहे. यासंदर्भात कुलगुरू, कुलसचिव यांना सूचना दिल्या आहेत, असे उच्च व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

”उच्च व उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय कोल्हापुरात” या अंतर्गत विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी उपक्रमाची कोल्हापुरातून सुरुवात झाली. विभागांतर्गत ३ हजार ६३५ पैक २ हजार ७६४ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने १७ पैकी १० जणांना नियुक्ती पत्र देण्याचे सामंत यांनी जाहीर केले.

आणखी वाचा- ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक

सीमाभागात शैक्षणिक संकुल –
सीमाभागात शैक्षणिक संकुल सुरू करण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी दहा एकर जागा देण्याचे मान्य केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही घेता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे तीन केंद्र सुरू केले जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू केंद्राअंतर्गत मराठी भाषा संवर्धनासाठी येत्या काळामध्ये नियोजन केले जाणार आहे. तसेच विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनास केंद्र येत्या पंधरा दिवसांमध्ये एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

तसेच, दहा जणांची अनुकंपा नियुक्ती दिली आहे. ४८० प्रकरणात त्रुटी आहेत तीही पूर्ततेनंतर मार्गी लावण्यात येतील. ३९१ प्रकरणे प्रलंबित असून, ७६ टक्के प्रकरणे निकालात निघाली आहेत, असेही सामंत म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 5:09 pm

Web Title: prabodhankar thackeray study centers will start in every university uday samant msr 87
Next Stories
1 ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक
2 पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शरद पवारांचा सवाल
3 “कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?”; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापले
Just Now!
X