करोनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा ऑनलाईन होणार असून अपवादात्मक स्थितीत विद्यार्थ्यांना केंद्रावर जाऊून परीक्षा देता येईल. १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रात्यक्षिक तर १ ऑक्टोबर पासून लेखी परीक्षा होणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होईल.

लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात बहुपर्यायी असणार आहे.  परीक्षेचा कालावधी दीड तास असून पदवी परीक्षा ६० गुणांची, तर पदव्युत्तर परीक्षा ६० गुणांची असून १२० मिनिटांचा कालावधी आहे. प्रात्यक्षिक परीक्षांचे आयोजन  विद्यार्थ्यांना महाविद्यालयात न बोलविता होणार आहे. त्यांचे मूल्यमापन १३ मार्चपर्यंत झालेल्या संबंधित विषयांचे नियमित प्रात्यक्षिक, अंतर्गत तोंडी परीक्षा, विद्यार्थ्यांची एकूण उपस्थिती यांच्या आधारे ऑनलाईन माध्यमातून संपर्क करून होईल.