18 November 2019

News Flash

प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद, प्रवाशांचा खोळंबा

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

(संग्रहित छायाचित्र)

मध्य रेल्वे मार्गावर प्रगती एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्याचं वृत्त आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात प्रगती एक्स्प्रेसचं इंजिन आज (दि.26) सकाळी बंद पडल्याची माहिती आहे. परिणीमी, पुण्याहून मुंबईला येणाऱ्या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या 12126 प्रगती एक्स्प्रेसचे इंजिन ठाणे स्थानकात बंद पडलं. त्यामुळे ही एक्स्प्रेस तासाभरापासून स्थानकातच थांबवण्यात आली . परिणामी मुंबईला जाणाऱ्या शेकडो प्रवाशांचा खोळंबा झाला.

 

First Published on May 26, 2019 1:58 pm

Web Title: pragati express engine failed at thane station