03 December 2020

News Flash

करोनामुळे मृत्यू होत नाही, सर्व मृत्यू नैसर्गिक; प्रकाश आंबेडकरांचा दावा

"माझा यावर आजिबात विश्वास नाही. कारण..."

(संग्रहित छायाचित्र)

देशात आणि महाराष्ट्रात दररोज हजारोंच्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. करोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून येत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी “करोनामुळे मृत्यू होत नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत,” असा दावा केला आहे. करोना आहे, यावरही आपला विश्वास नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी धार्मिक स्थळं खुली करण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत त्यांनी करोना आणि परिस्थितीवर भूमिका मांडली.

‘धार्मिक स्थळं खुली करण्यामागे तुमची नेमकी भूमिका काय आहे? गर्दी होऊ नये असे प्रयत्न केले जात असताना अशी मागणी का केली जात आहे?’ असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सरकारला करोनाविषयी काहीही कल्पना नाही, असं मला वाटतं. दुकानं सुरू करण्यासाठी, एसटी सुरू करण्यासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागत आहे. आज मंदिरं उघडा, यासाठी आंदोलन केलं. हे शासन करोनाच्या नावावर लोकांना फसवत आहे. करोना आहे, यावर माझा विश्वास नाही,” असं आंबेडकर म्हणाले.

‘महाराष्ट्रात दररोज दोनशे ते अडीशे लोकांचा मृत्यू करोनामुळे होत असताना तुम्हाला असे का वाटते की सरकार करोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे?, करोनामुळे लोकांचा मृत्यू होतोय हे तुम्हाला का मान्य नाही?’ या प्रश्नावर भूमिका मांडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,”जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू एकादिवशी होणारच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? भारतीय स्वत:शी तर लढत असतात, पण निसर्गाशी लढण्याचा आव आणत असतो. यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. करोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत,” असं सांगत आंबेडकर म्हणाले,”करोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा काय पुरावा आहे? पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का, की करोनामुळे मृत्यू झाला आहे? माझा यावर आजिबात विश्वास नाही. कारण मी माणसं जगताना बघतोय,” असं आंबेडकर यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 6:49 pm

Web Title: prakash ambedkar claim that no died for coronavirus bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन
2 चंद्रपूर जिल्ह्यातील पुराचा महावितरणास मोठा फटका
3 Coronavirus : सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश
Just Now!
X