News Flash

पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

या जिल्ह्यांत पावसाचा इशारा

(संग्रहित छायाचित्र)

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणासह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १ जूनला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. २ जूनला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस होणार आहे. ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकणात इतर ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. विदर्भामध्येही विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांत पावसाचा इशारा –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार प्रामुख्याने कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस वादळी पाऊस होईल. पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, परभणी आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसादरम्यान सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 8:06 am

Web Title: pre mansoon rain in maharshtra next four days nck 90
Next Stories
1 वैद्यकीय सेवेसाठी ४ हजार डॉक्टर
2 विस्थापित कुटुंबांना धान्य वितरणासाठी ईझी फॉम्र्स अ‍ॅपची निर्मिती
3 रुग्णांचे मनोधैर्य जागविण्यासाठी डॉक्टर पाटील दाम्पत्याचे प्रयत्न
Just Now!
X