दुष्काळी भागात जलस्रोत वाहते
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याने तळ गाठून असलेल्या धरणांच्या पाणीसाठय़ाकडे लोकांच्या नजरा लागून आहेत. बळीराजा आभाळाकडे डोळे लावून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे. दुष्काळी खटाव, माण, फलटण, खंडाळा या तालुक्यांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस कोसळल्याने येथील साखळी बंधारे भरले असून, कोरडे पडलेले जलस्रोत वाहते झाले आहेत.
सातारा जिल्ह्य़ातील बुधवारअखेरचा तालुकानिहाय पाऊस असा दुष्काळी खटाव सर्वाधिक ८४.२ मि.मी., माण ८०.१, फलटण ६१.६, खंडाळा ५२.६, कोरेगाव ५२.४, कराड ६४.८, पाटण ४२.२,सातारा ४५.४, जावली ६९.६, महाबळेश्वर ५९.६, वाई ४८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणक्षेत्रातही पाऊस झाला आहे. कोयना शिवसागराचा पाणीसाठा अंशत: वाढून १२.७९ टीएमसी म्हणजेच १२.१५ टक्के आहे. गतवर्षी आजमितीला कोयनेचा हाच पाणीसाठा सुमारे ३१ टीएमसी होता.
दरम्यान, बुधवारी दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील प्रतापगडला ६४ एकूण ९२, पाथरपुंजला ५३ एकूण १०१, तर महाबळेश्वरला १४ एकूण ४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ७ एकूण ८६ आणि कोयनानगरला २ एकूण ५७ मि.मी. पाऊस कोसळला आहे. सातारा जिल्ह्णातील अन्य धरणक्षेत्रातही मान्सूनपूर्व पाऊस चांगल्याप्रकारे कोसळला आहे. तारळी धरण येथे ३६ एकूण सर्वाधिक २४३, धोम बलकवडी येथे २८ एकूण ४९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 2:08 am