News Flash

गरोदर महिलेनं धावत्या रेल्वेत दिला गोंडस बाळाला जन्म!

कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले

-दत्तात्रय भरोदे

मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेसमध्ये एका गरोदर मातेने धावत्या ट्रेन मध्ये एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, या अनोळखी मातेच्या मदतीसाठी मात्र कसारा रेल्वे स्थानकात अनेक माताभगिनी धावल्या. तातडीने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात माता आणि बाळाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले.

आज (गुरूवार)सकाळी गोरेगाव येथे राहणारा राजाबाबू दास हा आपल्या गरोदर पत्नीसह आपल्या मूळ गावी कोलकाता येथे जाण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई हावडा-गीतांजली एक्सप्रेसमध्ये बसला गीतांजली एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानक सोडल्यावर गाडी खर्डी रेल्वे स्थानक सोडून कसाराकडे येत असतांना उम्बरमाळी ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान राजाबाबू यांची पत्नी रुमा या गरोदर असल्याने त्यांना प्रसूती कळा येऊ लागल्याने गाडीतील महिला सहप्रवाशांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, तो पर्यंत कसारा रेल्वे स्थानक आले कसारा स्थानकात उतरून राजाबाबू या प्रवाशाने कसारा रेल्वे पोलिसांना मदतीसाठी विनंती केली.

कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल येवले, महिला पोलीस कर्मचारी पूनम हाबळे, रेल्वे सुरक्षा बल (rpf ) च्या महिला कर्मचारी स्वाती मेश्राम यांनी तत्काळ गीतांजली एक्सप्रेसमध्ये असलेल्या गरोदर मातेकडे धाव घेतली तोपर्यंत त्या गरोदर माताची प्रसूती झाली होती. महिला पोलिसांनी दक्षता घेत त्या महिलेला रेल्वे डब्यातून सुखरूप खाली उतरवले प्रसूती झालेल्या महिलेच्या मदतीसाठी कसारा रेल्वे स्थानका जवळील देऊळवाडी येथील अंजना डोंगरे, भागीरथी भगत, कविता डोंगरे, मोहिनी भगत, पार्वती डोंगरे या महिलांनी तत्काळ कसारा रेल्वे स्थानकात धाव घेत, प्रसूत महिलेच्या बाळाचे पुढील सोपस्कर पार पाडत तिची त्रासातून सुटका केली. प्रसंगावधान राखत रेल्वे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका खासगी गाडीतून महिला व बाळ यांना तत्काळ कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देवेंद्र वाळुंज यांनी महिलेवर तत्काळ उपचार सुरु केले..माता व बाळ यांची प्राथमिक तपासणी व उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

प्रसंगवधान राखत रेल्वे पोलिसांनी स्थानिक महिलांची मदत घेऊन प्रसूत महिलेची व बाळाची सुखरूप सुटका करून तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. – वाल्मिक शार्दूल, पोलीस निरीक्षक, कल्याण लोहमार्ग.

धावत्या रेल्वे मध्ये प्रसूती झालेल्या महिलेची व बाळाची प्रकृती चांगली असुन त्यांच्यावर प्रसूती नंतरचे सर्व उपचार करण्यात आले आहे. – डॉ. देवेंद्र वाळुंज ,वैद्यकीय अधिकारी. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 9:48 pm

Web Title: pregnant woman gives birth to cute baby on a running train msr 87
Next Stories
1 “महात्‍मा गांधीजींचा विचार केवळ वर्धा व गडचिरोली जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे काय?”; भाजपाचा सवाल!
2 Corona : दिलासा! राज्यात मृतांच्या आकड्यात घट, नव्या करोनाबाधितांची संख्याही घटली!
3 चंद्रपूरची दारूबंदी अयशस्वी की मंत्री-शासन अयशस्वी? : डॉ.अभय बंग
Just Now!
X