रत्नागिरी : महाविद्यालयीन युवकांना वक्तृत्व कला जोपासण्यासाठी राज्यस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेतील रत्नागिरी विभागाची प्राथमिक फेरी आज (२६ फेब्रुवारी) गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेटय़े सभागृहात होणार आहे.

रत्नागिरी विभागीय स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी ‘निर्भया आणि नंतर’, ‘जंगलाच्या शोधात वाघोबा’, ‘स्वच्छ भारत : एक दिवास्वप्न’, ‘ज्यांचे त्यांचे गांधी आणि सावरकर’ आणि ‘ऑलिम्पिक वर्षांत क्रिकेटची चिंता’ हे राजकीय, सामाजिक, क्रीडा, पर्यावरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा धांडोळा घेणारे विषय देण्यात आले आहेत. विभागीय अंतिम फेरी येत्या ४ मार्च रोजी रत्नागिरीतच होणार आहे. त्या फेरीतील विजेता महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

प्रायोजक..

वीणा वर्ल्ड प्रस्तुत ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड’ असून या स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’ हे आहेत. नॉलेज पार्टनर चेतनाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च हे आहेत.