बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची शासनाने औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती केली असून त्यांच्या जागी प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. बदलीचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी जारी केले.

आस्तिककुमार पाण्डेय यांची फेब्रुवारी महिन्यात अकोला येथून बीडला बदली झाली होती. त्यांनी केलेल्या वाळू माफियाविरोधातील कारवाया, गौण खनीज वाहतुकीतील पारदर्शकता आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नामुळे नेहमीच ते चर्चेत राहिले.

Ichalkaranji
कोल्हापूर : इचलकरंजी पाणी योजनेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, निर्णयावर टीका आणि स्वागत
Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
Kalyan Dombivli Municipality, Suspends, Land Surveyor, Architect, tampering, building construction plan,
कल्याण डोंबिवली पालिका नगररचनेतील दोन कर्मचारी निलंबित
नाशिकमध्ये आंदोलक आदिवासी शेतकरी आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेश रोखला, सीबीएस चौकात ठिय्या

त्याबरोबरच चला शहर घडवूया ही मोहीम जनतेत स्वच्छतेची व जबाबदारीची जागरूकता निर्माण करणारी ठरली. त्यांची आता औरंगाबाद येथील महानगरपालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी नवीन जिल्हाधिकारी म्हणून यशदा प्रकल्पाच्या संचालिका प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती केली आहे.