03 August 2020

News Flash

रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

घर, शाळेवरील पत्र उडाली; उन्‍हाळी भात पीकाला मोठा फटका

रायगड जिल्‍हयाच्‍या काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली . कर्जत , खालापूर , सुधागड तालुक्‍यासह रोहा तालुक्‍याच्‍या काही भागात संध्‍याकाळी जोरदार वादळी वारे आणि वीजांच्‍या कडकडाटांसह पाऊस झाला .

दरम्यान ग्रामीण भागातील घर, शाळेवरील पत्रे उडाली . नागरिकांचं यामुळे मोठं नुकसान झालं आहे. वीजेचे खांब कोसळून पडल्‍याने अनेक भागातील वीजपुरवठादेखील खंडीत झाला होता . या पावसाचा फटका उन्‍हाळी भातपीकालाही बसला आहे . शेतात कापून ठेवलेले भाताचे भारे भिजून गेले आहेत . जिल्‍हयात अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तवला होता .

पुढील चार ते सहा तासांच्या दरम्यान कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग व बेळगावमधील काही भागात जोरदार वारा, ढगांच्या गडगडाटासह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून दुपारी वर्तवण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2020 9:13 pm

Web Title: presence of unseasonal rains in raigad district msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रात करोनाचे ५९७ नवे रुग्ण, २४ तासात ३२ मृत्यू, संख्या ९ हजार ९०० च्याही पुढे
2 पालघर : ग्रामीण रुग्णालयातून दोन तरुणांनी काढला पळ
3 Coronavirus : सोलापुरात दिवसभरात १३ रूग्ण वाढले
Just Now!
X