News Flash

महाराष्ट्रावर ‘तौते’ चक्रीवादळाचं संकट; पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली चर्चा

मुंबईत पुढच्या काही तासात अतिवृष्टीचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईपासून तौते चक्रीवादळ १२० किमी अंतरावर घोंगावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीला प्रचंड फटका बसत आहे. आता चक्रीवादळ संथगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असलं तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला.

अतिरौद्रवतार धारण केलेल्या तौते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली आहे. मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली असून, मोनो रेलची सेवा स्थगित करण्यात आली आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरून होणारी वाहतुकही रोखण्यात आली आहे. अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठंमोठ्या लाटा व वादळामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुढील काही तासात मुंबईसह परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे. मुंबईत आगामी काही तासांत ताशी १२० वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 3:58 pm

Web Title: prime minister modi spoke maharashtra cm uddhav thackeray on cyclone situation rmt 84
टॅग : Uddhav Thackray
Next Stories
1 “…तर रक्तरंजित लढाईला तयार राहा,” शिवसेना आमदाराचा ठाकरे सरकारला इशारा
2 “…तर शरद पवारांनी उजणी धरणच पुणे जिल्ह्यात वळवलं असतं,” शिवसेना आमदाराच्या टीकेमुळे वाद पेटण्याची चिन्हं
3 Tauktae Cyclone : ‘बीकेसी’च्या जम्बो कोविड केअर सेंटरमधील रूग्णांना अन्य रूग्णालायात हलविले!
Just Now!
X