News Flash

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कैदी आला तुरुंगाबाहेर

निवडणूक अर्ज भरल्यानंतर पुन्हा तुरुंगात

अरविंद साबळे

कोल्हापूरमध्ये अटकेत असलेल्या गुन्हेगाराने उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष बाब म्हणजे अरविंद साबळे हा गुन्हेगार कोल्हापूर येथील कळंबा तुरुंगामध्ये सध्या अटकेत आहे. अरविंद साबळेला एमपीडीअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. विशेष म्हणजे केवळ आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा असल्याने अरविंद साबळेने पिंपरी चिंचवड गाठले.

अरविंद साबळेला विशेष बाब म्हणून निवडणूक आयोगाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. अरविंद साबळे ब’ प्रभागातून बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. अर्ज भरल्यानंतर अरविंद साबळेला पुन्हा कोल्हापूरमधील तुरुंगात नेण्यात आले. अरविंद साबळेवर पिंपरी पोलीस स्थानकात खंडणी मागणे, मारामारी करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पिंपरी पोलीस निरीक्षक मुगळीकर यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 4:58 pm

Web Title: prisoner comes out to file nomination form for pimpri chinchwad municipal corporation election
Next Stories
1 Girish Oak : अभिनेते गिरीश ओक यांना अपमानास्पद वागवणूक; कलाकारांचा जाहीर निषेध
2 ‘कमवा आणि शिका’चा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर सोमनाथची आर्थिक परवड!
3 साखर संघर्षांत आता राजू शेट्टी
Just Now!
X