लोकसभा निवडणुकापासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपाचा छुपा पाठिंबा होताच. आता आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी आता ज्योतिषाचे काम करावे असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते आहे. चौकशी लावू अशी धमकीही त्यांना दिली जाते आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतले जाते आहे असाही आरोप चव्हाण यांनी केला.

आघाडी सरकारच्या काळात देखील किरकोळ घोटाळे होत होते. त्यावेळी घोटाळेबाजावर कारवाई केली. पण यांच्या कार्यकाळात तर  लाखो कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच अनेक भागांत घोटाळ्यांची प्रकरणं पुढे येत आहे. त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची संबधितावर कारवाई केली जात नाही. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही बॅंकाचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून काय साध्य होणार हे अद्याप पर्यंत योग्य स्पष्टीकरण सरकारकडून दिले गेले नाही असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

सरकारने कोल्हापूरला पूर्ण वेळ पालकमंत्री द्यावा : पृथ्वीराज चव्हाण

सांगली आणि कोल्हापूर येथे पूर आला. त्यावेळी त्या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. अनेक खात्यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्री जबाबदार आहे आणि त्यात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे त्यांना पूरस्थिती वर उपाय योजना काढण्यात यश आले नाही. त्यामुळे कोल्हापूरला पूर्णवेळ पालकमंत्री द्यावा. अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, सांगली आणि कोल्हापूर येथे २००५ मध्ये पूर आला होता. त्यावेळी आघाडी सरकारने तातडीने घटनास्थळी जाऊन धाव घेऊन मदत पोहोचवली होती. पण यंदाच्या पूरस्थिती दरम्यान सध्याचे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यात्रेत होता. यातून यांना पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत आहे. अशा शब्दात सत्ताधारी पक्षावर त्यांनी निशाणा साधला. तसेच ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी भाजपने वेळीच दखल घेतली असती. तेथील परिस्थिती नियंत्रणात आली असते. तसेच या जिल्ह्यातील राज्याचे कोयना आणि अलमट्टी धरणाच्या पाणी नियोजनासाठी समिती स्थापन करावी. यामुळे आगामी काळात पूरपरिस्थिती बाबत सतर्क राहण्यास मदत होईल. अशी भूमिका त्यांनी मांडली.